इंडसइंड बँकेच्या जुन्नर शाखेत ग्राहकांसाठी विविध सेवांचा शुभारंभ

Junnar Help
0

 


जुन्नर,ता.२५ : (प्रतिनिधी)  इंडसइंड बँकेच्या जुन्नर शाखेत इंडस ग्रॅन्डे अकाउंटचा शुभारंभ करण्यात आला असून या माध्यमातून ग्राहकांना बँकेच्या विविध सेवांचा लाभ घेता येणार आहे.

या सेवेचे ज्येष्ठ पत्रकार दत्ता म्हसकर यांनी शुक्रवारी ता.२३ रोजी सपत्नीक उदघाटन केले यावेळी बँकेचे शाखा व्यवस्थापक  भूषण कबाडी, कर्मचारी व ग्राहक उपस्थित होते.

इंडसइंड बँकेच्या जुन्नर येथील २११९ वी शाखा आहे.  ग्राहकांच्या सेवेसाठी बँक तत्पर असून वर्षभरात सामाजिक भान जपत  विविध उपक्रम राबवित असते. इंडस ग्रॅन्डे अकाउंटमुळे  बँकींग क्षेत्रात ग्राहकांना मूल्यवान सुविधांचा लाभ घेता येणार असल्याचे शाखा व्यवस्थापक भूषण कबाडी यांनी यावेळी सांगितले.

इंडसइंड बँकच्या ३१ मार्च २३ अखेर एकूण दोन हजार ६०६ शाखा असून २८७८ ए.टी. एम. ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. बँकेचा मार्च २०२३ रोजी एकूण निव्वळ नफा सात हजार ७४३ कोटी तर एकूण ठेवी ३ लाख ३६ हजार १२० कोटी इतक्या आहेत.

ग्रॅन्डे अंकाउंटच्या विशेष सुविधे अंतर्गत ग्राहकांसाठी डेडिकेटेड  रीलेशनशीप मॅनेजर उपलब्ध होणार आहे. एक वर्षासाठी लहान किंवा मध्यम लॉकर मोफत मिळणार असून फॅमिली बॅकींगसाठी एकूण आठ झीरो बॅलन्स अकाउंटस जोडण्याची सुविधा आहे

डेबिट कार्डवर २.५% पर्यंत कॅशबॅक आणि रीवॉर्ड पॉइन्टस .मोफत एअरपोर्ट विश्रामगृह व गोल्फ प्रवेश.बुक माय शो अँपवर मोफत चार तिकीट तसेच ग्राहकांना टाईम प्राईम वार्षिक सदस्यत्व प्राप्त होईल.स्वीगी आणि बिग बॉस्केट २०%

वार्षिक सवलत मिळेल

याशिवाय आपल्या बँक खात्यासाठी चॉईस नंबर उपलब्ध. सिनिअर सिटीझन साठी झीरो बॅलेन्स बचत खाते. लॉकर ची सुविधा.शेतकऱ्यासाठी (KCC) किसान क्रेडिट कार्ड कर्ज, त्याच प्रमाणे वैयक्तीक कर्ज, वाहन कर्ज , सोने तारण कर्ज, व्यवसाय कर्ज आणि वैद्यकिय व्यवसाय कर्ज आकर्षक व्याजात उपलब्ध असल्याचे कबाडी यांनी सांगितले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)