औटी यांना सहकारमहर्षी शिवाजीराव काळे आदर्श चेअरमन पुरस्कार

Junnar Help
0

औटी यांना सहकारमहर्षी शिवाजीराव काळे आदर्श चेअरमन पुरस्कार
जुन्न

र,ता.२४ :  यावर्षीचा माजी आमदार सहकारमहर्षी शिवाजीराव तथा दादासाहेब काळे आदर्श चेअरमन पुरस्कार राजुरी ता.जुन्नर  येथील  विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन सुदाम महादेव औटी यांना  मरणोत्तर प्रदान करण्यात आला आहे.
जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार त्यांचे सुपुत्र बाळासाहेब, संजय व भाऊ एस.एम. औटी यांनी स्वीकारला. गेल्या १२ वर्षांपासून  तालुक्यातील सहकारात उल्लेखनीय कार्य केलेल्या सोसायटीचे चेअरमन व सचिव यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असल्याचे व्यवस्थापक बाबाजी शिरसाठ यांनी संगितले.
जुन्नर तालुका सहकारी खरेदी विक्री संघांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व  कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे यांच्या हस्ते हा पुरस्कार मंगळवार ता.२२ रोजी समारंभपूर्वक देण्यात आला करण्यात आला.

यावेळी बाजार समितीचे उपसभापती प्रकाश ताजणे संचालक निवृत्ती काळे, पांडुरंग गाडगे, चंद्रकांत तळपे, वल्लभ शेळके, विक्रम भोर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मंगेश खिलारी व उपाध्यक्ष रामदास चतुर व  अरुण काळे तसेच सर्व संचालक तसेच तालुक्यातील विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटी चे अध्यक्ष,उपाध्यक्ष, संचालक व सचिव उपस्थित होते

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)