जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाला खिंडार

Junnar Help
0

जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाला खिंडार नूतन कार्यकारणी जाहीर नेतेपदी कोंडीबा लांडे अध्यक्षपदी मोहन नाडेकर : महिला आघाडी अध्यक्ष निशा साबळे 

जुन्नर,ता.०४ :(प्रतिनिधी) जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत जुन्नर तालुका  प्राथमिक शिक्षक संघाकडे पुरेसे सभासद संख्याबळ असताना संघटना अंतर्गत असलेल्या कुरघोडीच्या राजकारणामुळे दोन उमेदवार पराभूत झाले. त्याचे पडसाद आता तालुक्यातील शिक्षकांमध्ये उमटू लागले असून  जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघात  उभी फूट पडली आहे. 

संघाच्या पॅनलचे  17 उमेदवार विजयी करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या निष्ठावान सभासदांच्या शिक्षक संघाच्या उमेदवारांचा झालेला पराभव जिव्हारी लागल्याने आज दिनांक चार डिसेंबर 2022 रोजी  जुन्नर  येथे हॉटेल आशियाना येथील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष केशवराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाची नवी कार्यकारिणी  जाहीर करण्यात आली .

यामध्ये जुन्नर तालुका शिक्षक संघाच्या नेतेपदी कोंडीबा सोमा लांडे अध्यक्षपदी मोहन ज्ञानेश्वर नाडेकर  कार्याध्यक्षपदी अंकुश  ढवळा साबळे सर कोषाध्यक्षपदी निवृत्ती खेमा दिवटे सर, प्रवक्तापदी दत्तात्रय कोंडीबा उगले  संपर्कप्रमुख रामदास श्रावण गवारी  सरचिटणीस सचिन चिमाजी नांगरे महिला आघाडी अध्यक्ष निशा नामदेव साबळे कार्याध्यक्ष सविता दत्तात्रय उगले कोषाध्यक्ष निशा मुकुंद दिघे सरचिटणीस सुचिता कैलास बोऱ्हाडे प्रवक्ता जयश्री बाळासाहेब बांबळे संपर्कप्रमुख माया पंढरीनाथ शेळकंदे ही नूतन कार्यकारीणी जाहीर करण्यात आली  

याप्रसंगी बारामती तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष  हनुमंतराव शिंदे सर आदरणीय बापू खरात सर व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते . नवनियुक्त जुन्नर तालुका शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष केशवराव जाधव  बारामती तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष हनुमंतराव शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन नांगरे सर यांनी केले तर आभार निवृत्ती दिवटे सर यांनी मानले

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)