सर्पदंश झालेल्या ज्येष्ठ आदिवासी महिलेचा जीव वाचविण्यात यश : विषारी नागाने केला होता दंश
जुन्नर,ता.२८ : पिंपळगाव सिद्धनाथ ता.जुन्नर येथील ज्येष्ठ आदिवासी महिलेला अति विषारी जातीच्या नागाने दंश केला मात्र सहा दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर महिलेचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
याबाबतची माहिती अशी की, घराजवळील शेतात काम पिंपळगाव सिद्धनाथ येथील कांताबाई ज्ञानेश्वर घोगरे काम करत असताना २१ जून रोजी सायंकाळी त्यांना नागाने दंश केला. त्यांनी ही घटना ताबडतोब घरी सांगितली यावेळी घरच्यांनी त्यांचे जवळचे नातेवाईक डॉ. केदारी यांना सांगितले सर्पदंश झाल्याचे समजतात केदारी त्यांना जुन्नर येथील डॉ.कोकाटे यांचे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे कांताबाईना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथे डॉ. चंद्रकांत कुलकर्णी व डॉ. प्रीती कोकाटे यांनी त्यांचेवर तातडीने उपचार सुरू केले. दरम्यान रुग्णाची स्थिती अत्यंत बिकट होत चालल्याचे दिसून येतात त्यास कृत्रिम श्वास प्रणाली देऊन तीन दिवस औषधोपचार केले. त्यांच्या प्रयत्नामुळे रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे.रुग्ण कांताबाई यांनी त्यांनी डॉ. कोकाटे व डॉ. कुलकर्णी यांच्या रूपाने आपल्याला देवच भेटले असल्याचे भावना व्यक्त करत आभार मानले. दरम्यान कोकाटे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत सर्पदंश विषबाधा, हृदयविकार, तसेच पक्षाघात आदी गंभीर आजाराचे दोनशेहुन अधिक रुग्ण औषधोपचारानंतर पूर्ण बरे झाले असल्याचे डॉ. कुलकर्णी व कोकाटे यांनी सांगितले.
सर्पदंश झालेल्या ज्येष्ठ आदिवासी महिलेचा जीव वाचविण्यात यश : विषारी नागाने केला होता दंश
June 27, 2023
0