जुन्नर तालुका शिक्षक संघाला दुसऱ्यांदा पडले
खिंडार : असंख्य कार्यकर्त्यांनी केला शिक्षक समितीत जाहीर प्रवेश
जुन्नर,दि.०४ ; (प्रतिनिधी) जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अनेक शिक्षक सदस्य शनिवारी दि.०४ रोजी जुन्नर येथे एका कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीत दाखल झाले असल्याचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार होळकर, व जुन्नर तालुका अध्यक्ष बाळासाहेब लांघी यांनी सांगितले.
शिक्षक संघ थोरात गटातील एकाधिकारशाहीला कंटाळून सभासद शिक्षकांनी समितीमध्ये जाहीर प्रवेश केल्याने जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाला दोन महिन्यांत दुसऱ्यांदा मोठे खिंडार पडले आहे.शिक्षक संघाला हा दुसरा मोठा धक्का मानला जात असून शिक्षक संघतना खिळखिळी झाल्याची भावना सर्वसामान्य शिक्षकांची झाली आहे
यावेळी बोलताना शिक्षक संघाचे माजी कार्याध्यक्ष चंद्रकांत डोके म्हणाले, सर्वांना न्याय देणारी, न्यायाची चाड व अन्यायाची चीड असणारी, सर्वांना पुढे घेऊन जाणारी तसेच शिक्षकांच्या प्रश्नासाठी सतत झटणारी शिक्षक समिती ही महाराष्ट्रातील एकमेव शिक्षक संघटना असल्याने आम्ही शिक्षक समिती प्रवेश करण्याचे निश्चित केले.
जिल्हाध्यक्ष नंदकुमार होळकर म्हणाले, शिक्षक समिती ही राज्यातील एकमेव मान्यता प्राप्त शिक्षक संघटना असून बालक पालक शिक्षकांच्या प्रश्नासाठी सतत आंदोलन करत असणारी आणि आपल्या मागण्या मान्य करून घेणारी करणारी शिक्षक संघटना आहे. आपण या शिक्षक संघटनेमध्ये दाखल झालात आपलं खूप खूप स्वागत आपल्याला योग्य मानसन्मान दिला जाईल.
यावेळी विद्यमान संचालक माजी सभापती विजय कुऱ्हाडे, ज्योती शेलार यांनी आपले विचार व्यक्त केले. .यावेळी आपल्या मनोगतात अनेक कार्यकर्त्यांनी संघात विशिष्ट कार्यकर्त्यांनाच पद दिली जातात सर्वसामान्यांचा विचार होत नाही. यास कंटाळून सर्व कार्यकर्ते शिक्षक समितीमध्ये प्रवेश करत आहोत. शिक्षक समितीच्या येणाऱ्या तालुका अधिवेशनामध्ये अजून अनेक कार्यकर्ते शिक्षक समितीमध्ये प्रवेश करणार असल्याचे चंद्रकांत डोके यांनी सांगितले. शिक्षक समितीचे सरचिटणीस राजेश दुरगुडे यांनी समितीची घोडदौड या विषयी आपले विचार वक्त केले. पुणे जिल्हा शिक्षक समितीचे संपर्कप्रमुख संदीप आप्पा जगताप यांनीही यावेळी शिक्षक समितीची विचारधारा व शिक्षक समिती करीत असणारे कार्य याबद्दल आपल्या भाषणात उल्लेख केला यामध्ये शिक्षक संघाचे माजी कार्याध्यक्ष चंद्रकांत डोके सर शिक्षक संघाचे माजी सभापती आणि विद्यमान संचालक विजय कुऱ्हाडे सर संघाचे माजी सभापती सयाजी हाडवळे सर,शिक्षक संघाचे माजी विभाग प्रमुख निलेश बांगर सर, शिक्षक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते अनिल गुंजाळ, शिक्षक संघाचे २७ वर्षे निष्ठावंत काम करणारे सुनील शेलार सर तानाजी मुळे, राजू राठोड,राजू पाडेकर,आदर्श शिक्षक गणेश भोर स्वाती भोर मॅडम, द.ल. हडवळे, सलीम शेख यांच्यासह अनेक शिक्षकांनी व महिला शिक्षकांनी यावेळी शिक्षक समितीमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन जिल्हाध्यक्ष व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी हवेली तालुका शिक्षक समितीचे सरचिटणीस कुंजीर नाना मुळशी तालुका शिक्षक समितीचे सरचिटणीस कुंडलिक कांबळे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षक समितीचे अध्यक्ष बाळासाहेब लांघी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विठ्ठल जोशी व विलासराव साबळे सर यांनी केले तर आभार तालुका समितीचे कार्याध्यक्ष तुषार डुंबरे यांनी मानले.यावेळी शिक्षक समितीचे शिलेदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
जुन्नर तालुका शिक्षक संघाला दुसऱ्यांदा पडलेखिंडार : असंख्य कार्यकर्त्यांनी केला शिक्षक समितीत जाहीर प्रवेश
February 05, 2023
0