जुन्नरला आपदा मित्रांना रेस्क्यूचे प्राथमिक साहित्य

Junnar Help
0

आपदा मित्रांना रेस्क्यू साठीचे आवश्यक प्राथमिक साहित्य

जुन्नर,ता.२६ : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जुन्नर तालुक्यातील प्रशिक्षित आपदा मित्र यांना रेस्क्यू साठी लागणारे आवश्यक प्राथमिक  साहित्याचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला आहे.पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण  यांच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील प्रशिक्षित आपदा मित्र यांना रेस्क्यू करण्यासाठी  रेस्क्यू बॅग , लाईफ जॅकेट , रेनकोट , हेल्मेट , गॉगल , टॉर्च , प्रथमोपचार पेटी , पाणी बॉटल , मच्छर दाणी , लाईटर , कटर , शिट्टी आदी साहित्यांचा संच तहसीलदार रवींद्र सबनीस,निवासी नायब तहसीलदार सचिन मुंढे यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,(NDMA) नवी दिल्ली आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण(SDMA) मंत्रालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,(DDMA) जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आपदा मित्र प्रशिक्षणाच्या जुन्नर, आंबेगाव,खेड,भोर, वेल्हा या पाच तालुक्यात प्रशिक्षण पुर्ण झाले आहे. आज २६ जानेवारी  रोजी एकूण २२२ प्रशिक्षणार्थीचे प्रशिक्षण यशस्वी रितीने पुर्ण झाले आहे. सद्यस्थितीत पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि हवेली तालुक्यातील प्रशिक्षण सुरू असुन यामध्ये एकुण ११० प्रशिक्षणार्थीं प्रशिक्षण घेत आहेत. प्रजासत्ताक दिनी  जुन्नर तालुक्यातील- ५३, आंबेगाव - ६१, खेड - ३६, वेल्हा- ३७, भोर - ३५ अशा एकूण 
२२२ प्रशिक्षणार्थीना आपदा मित्रांना  संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांचे हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे.
तसेच बारामती, इंदापूर तालुक्याचे येत्या ३ फेब्रुवारी रोजी प्रशिक्षण सुरू होत आहे.
सोबत फोटो

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)