,दि.०१ : बोगस आदिवासींना संरक्षण देण्याच्या निर्णयाच्या विरोधात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ निषेध आंदोलन केले. यावेळी बोगस हटवा, आदिवासी वाचवा, शिंदे - फडणवीस सरकारचा निषेध असो, आदिवासींची विशेष भरती झालीच पाहिजे, आदी घोषणा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना डी वाय एफ आय चे तालुका सचिव गणपत घोडे म्हणाले, सरकारी नोकरी मिळविण्यासाठी आदिवासी असल्याचे खोटे कागदपत्र सादर करणाऱ्या सरकारी अधिकारी - कर्मचाऱ्यांना पर्याय सेवेत ठेवण्याची कोणतीही गरज नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयापेक्षा राज्य सरकार मोठे नसल्याने न्यायालयाच्या आदेशाचे पालन झाले पाहिजे असे सांगत राज्य सरकारच्या २१ डिसेंबर २०१९ रोजीचा शासन निर्णय रद्द करण्यात आल्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ५ मे २०२१ रोजी दिला असे असतानाही राज्य सरकार गुन्हेगारांना पाठिशी घालत आहे.
यावेळी यावेळी बोलताना एस एफ आय चे जिल्हा सहसचिव प्रविण गवारी म्हणाले, राज्य सरकारने घेतलेला आदिवासींमधील बोग व्यक्तींना संरक्षण देण्याच्या निर्णयाचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत. व राज्य सरकारकडे, बोगस व्यक्तींना कायम न करता जी अदिवासी समाजासाठी राखीव पदे आहेत, त्या ठिकाणी तात्काळ भरती प्रक्रिया राबवून आदिवासींची पदे भरण्यात यावीत. त्याचबरोबर पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र - नागापूर हे पुन्हा सुरू करण्यात यावे . आणि प्रवेश अर्ज भरलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्वरित वसतिगृहात प्रवेश देण्यात यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी एस एफ आय जुन्नर तालुका सचिव अक्षय घोडे, किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी, डॉ. मंगेश मांडवे, डॉ.गोविंद गारे विचार मंचे प्रमुख राजू शेळके, तसेच एस एफ आयचे सचिन साबळे, सुवर्णा साबळे, अक्षय गारे, दादाभाऊ साबळे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.