जुन्नर शहरातील ब्राह्मण बुधवार पेठेतील गटारीचे काम हा शहराच्या विकासाचा नवीन प्रयोग असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. स्थानिक नागरिकांची मागणी नसताना सुस्थितीतील चांगली बंदिस्त मोठी काँक्रीटी गटार खोदून मूळ गटारीच्या आकारापेक्षा कमी व्यासाचे पाईप टाकून काम केल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नगर पालिकेच्या बांधकाम विभागाच्या कामांमुळे निधीचा दुरुपयोग होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
----------------------------------------