जुन्नर,दि..०१ : जुन्नर तालुक्यातील १३ गावांच्या सरपंच पदासाठी आज गुरूवार दि..०१ रोजी २९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी ता.०२ रोजी शेवटची मुदत आहे. उमेदवारी अर्ज पारंपारिक पध्दतीने स्विकरण्यात येत असल्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी सांगितले.
सोमतवाडी, पारगाव तर्फे आळे, वानेवाडी व काले या चार गावच्या सरपंच पदासाठी आज पर्यत एकही अर्ज आला नाही. सरपंच पदासाठी आलेले अर्ज पुढीलप्रमाणे :- काळवाडी (४),झापवाडी (५), सोमतवाडी (०),सावरगाव (२),साकोरी (३),आणे (४) ,पारगाव (०), सुलतानपूर (१), बोतार्डे (२), हिवरे तर्फे मिन्हेर,(१),आंबे (१), हातवीज (२),वानेवाडी (०),भिवाडे खुर्द (१), विठ्ठलवाडी (२), काले (०), शिंदे (१).
सतरा ग्रामपंचायतीच्या सरपंच व ५५ प्रभागातील १४० सदस्यांसाठी निवडणूक होत असून तेरा ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी एकूण १५६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सोमतवाडी, पारगाव तर्फे आळे, वानेवाडी व भिवाडेखुर्द या चार ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी एकही अर्ज आला नाही. सदस्यांसाठी आलेले अर्ज पुढील प्रमाणे : काळवाडी (२९) ,झापवाडी (२४),सोमतवाडी (०), सावरगाव (१९),साकोरी (१६), आणे (२४), पारगाव (९), सुलतानपूर (८),बोतार्डे (१८), हिवरे तर्फे मिन्हेर (२),आंबे (०), हातवीज (१), वानेवाडी (०), भिवाडे खुर्द (०), विठ्ठलवाडी(१), काले (१), शिंदे (४).
उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी शुक्रवार ता.२ डिसेंबर पर्यत मुदत असून उमेदवारी अर्जाची छाननी ५ डिसेंबर, चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिद्धी ७ डिसेंबर व मतदान १८ डिसेंबर व मतमोजणी २० डिसेंबर रोजी होणार आहे.
------------------------------------------------------