जुन्नर,दि.३० : विवाहितेचा हुंडा व प्रापंचिक कारणावरून मानसिक व शारीरिक छळ केल्याच्या कारणावरून पती, सासू,सासरे,दिर व नणंद यांचे विरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची फिर्याद दिपाली साईनाथ गिरमे रा.सासवड हल्ली मुक्काम आगर-विठ्ठलवाडी ता. जुन्नर यांनी दिली आहे. पोलीसांनी साईनाथ नाना गिरमे, मीना गिरमे, नाना गिरमे,तानाजी गिरमे सर्व रा. सासवड ता. पुरंदर व योगिता माळी रा. बारव,ता. जुन्नर यांचे विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सासरी सासवड येथे लग्नानंतर तीन महिन्यापासून गेली बारा वर्षे तुला स्वयंपाक तसेच घरात काहीच काम येत नाही आदी प्रापंचिक कारण पुढे करून लग्नात हुंडा दिला नाही, मान पान केला नाही तसेच प्रेम संबंधाचा संशय घेऊन दिपालीस वेळोवेळी हात, लाथा बुक्क्यांनी व काठीने मारहाण करून, शिवीगाळ दमदाटी करून, जीवे मारण्याची धमकी देत मानसिक व शारीरिक छळ करत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस हवालदार मनीषा ताम्हाणे पुढील तपास करत आहेत.
------------------------------------------
