सात गावाच्या सरपंचासाठी १४ जणांचे अर्ज जुन्नर,दि..३० : जुन्नर तालुक्यात १७ ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यांसाठी निवडणुका होत आहेत. आज बुधवार दि..३० अखेर सात गावाच्या सरपंचासाठी चौदा जणांनी अर्ज दाखल केले.
काळवाडी(४) झापवाडी (३), साकोरी (२), बोतार्डे (२), सावरगाव (१), हिवरे तर्फे मिण्हेर (१) असे एकूण १४ उमेदवारी अर्ज दाखल झाले अशी माहिती तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी दिली. दहा ग्रामपंचायतीच्या सरपंचासाठी एकही अर्ज आला नाही.
सतरा ग्रामपंचायतीच्या १४० सदस्यांसाठी देखील निवडणूक होत असून सात ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी एकूण ६१ अर्ज दाखल झाले आहेत. यात काळवाडी (२४), बोतार्डे-(१४), साकोरी-(१), पारगाव तर्फे आळे-(४), सावरगाव-(३),झापवाडी-(३),आणे-(१) यांचा समावेश असून अन्य दहा ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी एकही अर्ज आला नाही.
उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी सोमवार शुक्रवार ता.२ डिसेंबर अंतिम मुदत आहे. अर्जाची छाननी ५ डिसेंबर, चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिद्धी ७ डिसेंबर व मतदान १८ डिसेंबर व मतमोजणी २० डिसेंबर रोजी होणार आहे.
-------------------------------------------

👌👌👍🙏
ReplyDelete