सरपंच पदासाठी एक तर चार ग्रामपंचायतीसाठी नऊ उमेदवारी अर्ज

Junnar Help
1

 


जुन्नर,ता.२७ : जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत  निवडणूकीसाठी (आज सोमवार ता.२८ रोजी ) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी नव्याने स्थापित झालेल्या झापवाडीच्या सरपंच पदासाठी एक तर काळवडी (४), साकोरी(२), बोतार्डे व पारगाव तर्फे आळे प्रत्येकी एक ह्या चार ग्रामपंचायतीच्या सदस्यांसाठी ९ उमेदवारी अर्ज दाखल झाले अशी माहिती तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी दिली.
तालुक्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर २२ अखेर मुदत संपणाऱ्या १५ व  नव्याने स्थापित झालेल्या २ अशा एकूण १७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे.या ग्रामपंचायतीसाठी दहा निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. यात काळवाडी, सोमतवाडी, सावरगाव, साकोरे तर्फे आळे, आणे, पारगाव तर्फे आळे, सुलतानपूर, बोतार्डे, हिवरे तर्फे मिन्हेर, आंबे, हातवीज, वानेवाडी, भिवाडे खुर्द, काले व  शिंदे या १५ ग्रामपंचायती तसेच  झापवाडी व विठ्ठलवाडी (येणेरे) या दोन नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी थेट निवडणूक होत आहे.
उमेदवारी अर्ज मागवण्याचा व सादर करण्यासाठी सोमवार ता.२८ ते  शुक्रवार ता.२ डिसेंबर पर्यत मुदत असून उमेदवारी अर्जाची छाननी ५ डिसेंबर, चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिद्धी ७ डिसेंबर व मतदान १८ डिसेंबर व मतमोजणी २० डिसेंबर रोजी होणार आहे.
-------------------------------------------

Post a Comment

1Comments
Post a Comment