![]() |
कु.साक्षी जनार्दन मरभळ मा.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सो. यांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना. |
जुन्नर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील बोतार्डे गावाच्या शेतकरी कुटुंबातील कन्या कु.साक्षी जनार्दन मरभळ हिने National Talent Search Examination (NTSE) या All India leval परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
नुकताच १५ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हा परिषद पुणे येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा.भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते साक्षी मरभळ हिस सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
वडिलांच्या सहकार्याने व अत्यंत गरीब व कष्टमय परिस्थिती तिने अभ्यास करून हे यश संपादन केले असल्याचे सांगितले.
