जुन्नर उपविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची दहा किलोमीटरची दौड

Junnar Help
0

जुन्नर , ता.१२ : जुन्नर उपविभागातील नारायणगाव, आळेफाटा, ओतूर व जुन्नर पोलीस ठाण्याचे प्रभारी व दुय्यम अधिकारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी आज शुक्रवार ता.१२ रोजी सकाळी दहा किलोमीटर अंतराची दौड पूर्ण केली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी मंदार जवळे यांनी दिली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली किल्ले शिवनेरी पायथा ते वडज धरण जलाशय अशी दुहेरी दौड आयोजित करण्यात आली होती. या दौडीत जवळे,पोलीस निरीक्षक विकास जाधव तसेच ६० पुरुष व १२ महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यात पुरुष गटात निलेश चव्हाण, राजेंद्र देवकाते व संतोष पर्वते व महिला गटात रूपाली मिंढे, निकिता जेजुरकर व मोनिका अरगडे यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)