शाळेतील बाळगोपाळांनी काढली संत तुकाराम महाराजांची पालखी.

Junnar Help
0


प्रतिनिधी :
अविनाश मुंढे -  लोहगाव (पुणे) | अनमोल संस्कृती आणि संतांची भूमी म्हंटलं की महाराष्ट्र राज्याकडे पाहिले जाते. महाराष्ट्राची संस्कृती आणि संतांची वाणी हे महाराष्ट्राच्या मातीला लाभलेले वरदान आहे. आषाढी वारीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी भक्त पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनासाठी येत असतात.

विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार व्हावेत व वारीचे महत्व विद्यार्थ्यांना समजावे यासाठी श्री.संत तुकाराम माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय लोहगाव (पुणे) यांच्या वतीने शनिवार दि.०२/०७/२०२२ रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा पारंपरिक पोशाख परिधान करून. हरिनामाचा जयघोष व संत तुकाराम महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली होती.

हा नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यालयातील शिक्षक वर्गाच्या सहकार्यातून व मार्गदर्शनातून राबविण्यात आला. अशी माहिती माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याधापिका गायकवाड मॅडम व इयत्ता तिसरीच्या वर्गशिक्षिका सौ.जाधव मॅडम यांनी दिली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)