जुन्नर तालुक्यात गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.

Junnar Help
0


जुन्नर, ता.१४ : जुन्नर तालुक्यातील जुन्नर, कुसुर, उदापुर, आळेफाटा, ओझर  येथील श्री स्वामी समर्थ मठात बुधवार ता.१३ रोजी गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दिवसभर पाऊस कोसळत असताना देखील भाविकांनी उत्सवासाठी गर्दी केली होती.

जुन्नर येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ येथे श्री स्वामी समर्थांना सायंकाळी  महाआरतीच्या वेळी विविध ५६ पदार्थांचा महानैवेद्य भाविकांकडून अर्पण करण्यात आला. विविध धार्मिक कार्यक्रमानी  मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करण्यात आला.  

यानिमित्ताने सकाळी महाअभिषेक, तुलसी अभिषेक,दुपारी होमहवन, सांयकाळी भजन संध्या व नंतर महाआरती आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

समर्थनगर कुसुर ता.जुन्नर येथील  श्री दत्त व श्री स्वामी समर्थ मंदिरात भाविकांनी गुरुचरणी पूजा केली. गुरु वाक्य मंत्र समजून श्रद्धापूर्वक गुरुभक्ती केली. सकाळी श्री भूपाळी आरती, श्री दत्तात्रेय, श्री स्वामी समर्थ मूर्तींना अभिषेक, साईमाऊली समाधी पूजन करण्यात आले. होमहवन झाल्यानंतर निशा कोंडे यांनी श्री स्वामी समर्थ सेवा विषयी मार्गदर्शन केले. गुरुवर्य तुकाराम महाराज दुराफे यांचे पाद्य पूजन करण्यात आले. यानंतर महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दत्तात्रेय पांडे यांनी पौरोहित्य केले. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)