जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागातील उंडेखडक (रावतेवस्ती) येथे भूस्खलन - कोणतीही जीवितहानी नाही.

Junnar Help
0

जुन्नर | पुणे जिल्ह्यातील काही भागामध्ये पावसाने मोठ्याप्रमाणात  थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान  होणे , घरांची पडझड होणे , दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. जुन्नर तालुक्यातील उंडेखडक (रावतेवस्ती) येथे दिनांक १३/०७/२०२२ रोजी सायंकाळी ४ वा. सुमारास भूस्खलन झाल्याची माहिती संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य निलेश रावते यांनी दिली. डोंगरावरील मातीचा काही भाग खचल्याने झाडे माती खाली गाडली गेली आहेत. नागरी वस्ती काही अंतरावर असल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. 

काल याभागात पावसाचा जोर अधिक असल्याने दुरध्वनीवरून घटनेची माहिती जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके तसेच राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते  भाऊ देवाडे यांना देण्यात आली होती. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून आमदार महोदय यांनी जुन्नरचे तहसिलदार रविंद्र सबनीस व गटविकास अधिकारी माळी यांना याबाबत  दुरध्वनीवरून माहिती देऊन तात्काळ स्थळपाहणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. 

आज पावसाचे प्रमाण काही अंशतः कमी असल्याने शासकीय अधिकाऱ्यांनी सकाळीच घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. नागरिकांना सतर्क राहण्याचे व काळजी घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या. यावेळी जिओलोजिकल सर्वेक्षण करण्याची मागणी निलेश रावते यांनी केली आहे.तसेच   ग्रामस्थांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये. लागणारी आवश्यक ती मदत करण्याचे आव्हान रावते यांनी केले.

 यावेळी घटनास्थळाची पाहणी  सहाय्यक गटविकास अधिकारी हेमंत गरीबे ,  तलाठी प्रणित पाटील , ग्रामसेविका कोकणे मॅडम , आदि अधिकारी व संजय गांधी योजना सदस्य निलेश रावते ,  खामगावचे उपसरपंच अजिंक्य घोलप , राष्ट्रवादी युवक अध्यक्ष संदिप मुंढे . युवा कार्यकर्ते पिलाजी मुंढे आदि मान्यवरांनी केली.



Post a Comment

0Comments
Post a Comment (0)