जुन्नर,दि.०२ : (प्रतिनिधी) जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या सन २०२३ च्या पहिल्या दिनदर्शिकेचे नारायणगाव ता.जुन्नर येथे रविवारी ता.०१ रोजी दिमाखात प्रकाशन करण्यात आले.
जुन्नरचे आमदार अतुल बेनके, श्रीराम पतसंस्थेच्या ज्येष्ठ संचालिका राजश्री बेनके, पतसंस्थेचे अध्यक्ष तान्हाजी डेरे व संचालक तसेच शिक्षक संघाचे पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते.
आमदार बेनके यांनी शिक्षक संघाच्या उपक्रमाचे कौतुक करताना कोणता वार,तिथी, सण कधी आहे हे पाहण्यासाठी नाही तर आपल्या पुढील वर्षाचे चांगले नियोजन करण्यासाठी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा असल्याचे मत व्यक्त केले याप्रसंगी जुन्नर तालुका शिक्षक संघाचे नेते कोंडीबा लांडे , जुन्नर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष मोहन नाडेकर , जुन्नर तालुका शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष अंकुश साबळे, जुन्नर तालुका शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष निवृत्ती दिवटे, संपर्कप्रमुख रामदास गवारी, जुन्नर तालुका शिक्षक संघाचे प्रवक्ते दत्तात्रय उगले, जुन्नर तालुका शिक्षक संघाचे सरचिटणीस सचिन नांगरे, जुन्नर तालुका शिक्षक संघाच्या महिला आघाडीचे अध्यक्ष निशा साबळे,कार्याध्यक्ष सविता उगले ,कोषाध्यक्ष निशा दिघे, संपर्कप्रमुख माया शेळकंदे ,प्रवक्त्या जयश्री बाळासाहेब बांबळे, तालुका शिक्षक संघ महिला सरचिटणीस सुचिता बो-हाडे तालुका शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विनोद साबळे, मुकुंद दिघे, पंढरीनाथ शेळकंदे ,सरला दिवटे , सहचिटणीस बाळासाहेब दिघे, तुकाराम वडेकर, संघटक लीलावती नांगरे सल्लागार रमेश सावळे , चिंतामण लांडे, हरिभाऊ उंडे, मनिषा नाडेकर व विविध क्षेत्रासतील मान्यवर उपस्थित होते.
------------------------------------------------------------