जुन्नर - (ता.०२) : जुन्नर तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पावसाळ्यानंतर घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले असल्याचे महसूल विभागातून सांगण्यात आले. यात नव्याने स्थापित झालेल्या झाप व विठ्ठलवाडी या दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
निवडणुका होणाऱ्या बहुतेक ग्रामपंचायती आदिवासी भागातील आहेत. पावसाळ्यात या भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
तालुक्यातील जानेवारी २१ ते सप्टेंबर २२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या ३८ ग्रामपंचायतीं असून या ग्रामपंचायतीची प्रभाग रचना, आरक्षण जाहीर झाले असून मतदार याद्या प्रसिध्द झाल्या आहेत. पावसाळ्यानंतर निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतीं पुढील प्रमाणे : मढ, खुबी, कोपरे, तळेरान, सितेवाडी, घाटघर, अजनावळे, जळवंडी, उंडेखडक, राजुर, पूर, अंबोली, आपटाळे, खानगाव, घंगाळदरे, तांबे, मांडवे, पिंपळगावजोगा, पारगाव तर्फे मढ, देवळे, हडसर, गोद्रे,उच्छिल, तेजुर, इंगळून, भिवाडे बुद्रुक, सोनावळे, सुराळे, कोल्हेवाडी, चिल्हेवाडी, माणिकडोह, काळवाडी, दातखिळेवाडी, उंब्रज नंबर २, येणेरे, विठ्ठलवाडी, मंगरूळ, झापवाडी इत्यादी.

Nice
ReplyDelete