शिवनेरी श्री २०२३ चा मानकरी अनिकेत राजगुरू

Junnar Help
0

शिवनेरी श्री २०२३ चा मानकरी अनिकेत राजगुरू
जुन्नर : पुणे बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन व बॉडी बिल्डिंग फिजिक स्पोर्ट्स संघटनेनेजुन्नर येथील  शिवनेरी फिटनेसच्या वतीने आयोजित शरीर सौष्ठव स्पर्धेत अनिकेत राजगुरू शिवनेरी श्री २०२३ किताबाचा मानकरी ठरला.
या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण २३४ स्पर्धकांनी सहभाग घेतला. संघटनेचे अजय गोळे, मंगेश परदेशी आणि शिवनेरी फिटनेस महेश शेटे,जितेश शेटे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या स्पर्धेसाठी सेलिब्रिटी ट्रेनर आणि २०१६ चे भारत श्री सुनील मगदूम आणि फिटनेस मॉडेल मोनिका चिखलकर तसेच मयुर दरंदळे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात शिवनेरी श्री २०२३ स्पर्धेसाठी बॉडी बिल्डर अनिकेत राजगुरू,राजेश काळे व निलेश धोंडे यांच्यात चुरस  झाली. पंचानी दिलेला निकाल पुढीलप्रमाणे :- शिवनेरी श्री २०२३ किताबाचा मानकरी अनिकेत राजगुरू. उपविजेता  राजेश काळे. मेन फिजिक्स- मानकरी अथर्व थोपटे.बेस्ट पोझर- संदीप तिवडे.बेस्ट इम्प्रू निलेश धोंडे .
स्पर्धेचे पंच म्हणून  प्रमोद नाईक, अतुल राऊत, कौस्तुभ शेंडगे , किरण जाधव, संग्राम पवार, राम बराटे, युनूस काझी, विकास पाटील यांनी काम पाहिले. गट निहाय पहिले पाच क्रमांक पुढील प्रमाणे :-
(१) ५५ किलो वजन गट : दीपक कांबळे-,अजय ओझरकर-, सोमनाथ पाल, निलेश गजरमल, विनायक कालरीकंडी
(२)६०किलो वजन गट: संदीप तिवडे, हर्षल काटे, सिद्धेश गडगे, राजेश क्षीरसागर, योगेश वाडेकर
(३)६५ किलो वजन गट:- निलेश धोंडे, बिपिन साष्टे, अक्षय वाडीकर, नरेंद्र वाल्हेकर, ऋषिकेश सोनटक्के
(४)७० किलो वजन गट :- राजेश काळे, ऋषिकेश बिरेदार,
प्रथमेश कांबळे, ओंकार बांधीगरे, प्रथमेश कांबळे.
(५)७५ किलो वजन गट:- अनिकेत राजगुरू, विनोद कागडे, अमर पडवळ, अजय रक्ताटे, शिवम वडार
(६) ७५ किलो वरील वजन गट :- फिरोज शेख, मिथुन ठाकूर, संदेश नलावडे, ऋत्विक जाधव, अनिकेत भोसले.
(७)मेन फिजिक्स  पहिला गट:- अथर्व थोपटे, सागर कामठे,
अजित तावडे,सागर कांमाठे, ज्ञानेश्वर वाघमारे.
(८)मेन्स फिजिक्स दुसरा गट :- ऋषिकेश बिरेदर, प्रथमेश कांबळे, अमर पडवळ, ऋत्विक जाधव, प्रशांत धातरकर. या स्पर्धेचे आयोजन शिवनेरी फिटनेस जुन्नर यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सागर कोळगे,किरण पोवार,गौरी शेटे, स्नेहल शेटे,शुभम चतुर,राहुल शेटे,निखिल शेटे,संदीप शेटे, किरण शेटे,विशाल कानिटकर यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन विलास कडलाक यांनी केले.

-------------------------------------------------------------------------.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)